इयत्ता १ ली नवीन अभ्यासक्रम प्रशिक्षणासाठी जिल्हा/तालुका स्तरावर प्रशिक्षण आयोजन — SCERT मार्गदर्शक सूचना
School Edutech Team
राज्यातील इयत्ता १ ली च्या शिक्षकांसाठी नवीन अभ्यासक्रम प्रशिक्षण – मार्गदर्शक सूचना
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (SCERT), महाराष्ट्र, पुणे यांनी २४ मे २०२५ रोजी इयत्ता १ ली च्या शिक्षकांसाठी नवीन अभ्यासक्रम प्रशिक्षण आयोजनासाठी मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केल्या आहेत. या प्रशिक्षणाचे आयोजन राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० अंतर्गत २०२५-२६ पासून टप्प्याटप्प्याने होणाऱ्या नवीन अभ्यासक्रमाच्या अंमलबजावणीच्या पार्श्वभूमीवर करण्यात येत आहे.
प्रशिक्षण आयोजनाची ठळक वैशिष्ट्ये:
- प्रशिक्षणाची अंमलबजावणी: १६ जून २०२५ पासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होणार असल्यामुळे सर्व प्रशिक्षण १५ जून २०२५ पर्यंत पूर्ण होणे आवश्यक आहे.
- लक्ष्यसमूह: सर्व प्रकारच्या शाळांतील इयत्ता १ ली शिकविणारे शिक्षक – शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी अनुदानित, विना अनुदानित, व स्वयंअर्थसहायित.
- प्रशिक्षण कालावधी: ३ दिवस, दररोज ४ तासिका (प्रत्येकी ९० मिनिटांची).
- प्रशिक्षण माध्यम: मराठी, उर्दू, व इंग्रजी शाळांसाठी स्वतंत्र प्रशिक्षण.
- बैठक व्यवस्था: प्रत्येक ५० प्रशिक्षणार्थ्यांसाठी एक बेंच.
- प्रशिक्षण स्वरूप: जिल्हास्तर (निवासी) व तालुकास्तर (अनिवासी).
प्रशिक्षणाचे नियोजन:
उपक्रम | नियोजित कालावधी | कालावधी |
---|---|---|
जिल्हास्तर TOT (मराठी माध्यम) | २८ ते ३० मे २०२५ | ३ दिवस |
जिल्हास्तर प्रशिक्षण (उर्दू/इंग्रजी) | ०२ ते १५ जून २०२५ | ३ दिवस |
तालुकास्तर प्रशिक्षण (मराठी माध्यम) | ०२ ते १५ जून २०२५ | ३ दिवस |
इ. १ लीचे प्रशिक्षणार्थी (विशेष बेंच) | १३ ते १५ जून २०२५ | ३ दिवस |
महत्त्वाच्या सूचना:
- प्रशिक्षणासाठी शाळांमधून प्रत्यक्ष इयत्ता १ ली शिकविणाऱ्या शिक्षकांचा समावेश करणे बंधनकारक.
- प्रत्येक शाळेतील इ. १ लीच्या मंजूर तुकड्यांप्रमाणे शिक्षकांचा समावेश.
- प्रशिक्षणाआधी व नंतर पूर्वचाचणी, उत्तरचाचणी, व अभिप्राय फॉर्म ऑनलाईन भरावेत.
- पायाभूत शिक्षण अभ्यासक्रम २०२४ भाग १ व २ चा वापर अनिवार्य.
- खाजगी अनुदानित व विना अनुदानित शाळांसाठी स्वतंत्र आणि मोफत प्रशिक्षण.
- केवळ प्रशिक्षित शिक्षकांनाच इ. १ लीचा वर्ग अध्यापनासाठी नियुक्त केले जाईल.
- प्रशिक्षण खर्चाची तरतूद Samagra Shiksha 2025-26 अंतर्गत.
प्रशिक्षण खर्च मर्यादा:
प्रशिक्षण स्तर | प्रशिक्षणार्थी व तज्ज्ञांसाठी खर्च | सुलभक मानधन |
---|---|---|
जिल्हास्तर (निवासी) | रु. १०००/- प्रतिदिन | रु. ५००/- प्रतिदिन |
तालुकास्तर (अनिवासी) | रु. १५०/- प्रतिदिन | रु. ४००/- प्रतिदिन |
नोंद: सर्व खर्च आर्थिक तरतुदीनुसार PFMS/NEFT द्वारे अदा केला जाईल.
प्रशासनिक जबाबदाऱ्या:
- गटशिक्षणाधिकारी व प्रशासन अधिकारी — प्रशिक्षण पूर्णत्वाची दक्षता.
- DIET प्राचार्य व शिक्षणाधिकारी (प्राथमिक) — संनियंत्रण व अंमलबजावणी.
If you have any query regrading Site, Advertisement and any other issue, please feel free to contact at schooledutech.com@gmail.com