महाज्योती – JEE/NEET/MHT-CET 2025-27 परीक्षापूर्व मोफत ऑनलाईन प्रशिक्षणासाठी अर्ज करणाऱ्या संबंधित संपूर्ण माहिती
महाज्योती (महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था), नागपूर मार्फत महाराष्ट्रातील मागासवर्गीय, भटक्या जाती, विमुक्त जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.
JEE, NEET आणि MHT-CET 2025-27 परीक्षांच्या तयारीसाठी मोफत ऑनलाईन प्रशिक्षण आणि त्यासोबत मोफत टॅब व दररोज 6GB इंटरनेट डेटा दिला जाणार आहे.
अर्जासंदर्भातील महत्त्वपूर्ण माहिती:
- अर्ज प्रक्रिया 15 मे 2025 पासून सुरू झाली आहे.
- अर्ज सुधारणा व कागदपत्रे अपलोड करण्याची अंतिम तारीख: 20 जून 2025
- शैक्षणिक पात्रता:
- ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी – 10वीत किमान 60% गुण
- शहरी भागातील विद्यार्थ्यांसाठी – 10वीत किमान 70% गुण
टीप: उपलब्ध निधी व संचालक मंडळाच्या मान्यतेनुसार मर्यादित पात्र विद्यार्थ्यांची निवड गुणानुक्रमाने केली जाईल.
अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे:
- आधार कार्ड (समोर आणि मागील बाजू)
- रहिवासी प्रमाणपत्र (Domicile Certificate)
- जात प्रमाणपत्र (Caste Certificate)
- वैध नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र
- 10 वी ची गुणपत्रिका
- ११ वी विज्ञान शाखेतील बोनाफाईड दाखला व प्रवेश पावती
- दिव्यांग असल्यास प्रमाणपत्र
- अनाथ असल्यास प्रमाणपत्र
अर्ज कसा करावा?
- महाज्योतीच्या संकेतस्थळावर लॉगिन करा: www.mahajyoti.org.in
- Notice Board मधील "Application for JEE/NEET/MHT-CET- Batch-2025-27 Training" लिंक वर क्लिक करा.
- सर्व आवश्यक कागदपत्रे स्पष्ट स्कॅन करून, स्वाक्षरीसह अपलोड करा.
महत्त्वाच्या लिंक्स:
- अर्ज करण्याची लिंक: mahajyoti.org.in/en/mht-cet-jee-neet-2025
- डायरेक्ट रजिस्ट्रेशन लिंक: neet.mahajyoti.org.in – Mobile Verification
अर्ज प्रक्रिया:
विद्यार्थ्यांनी महाज्योतीच्या अधिकृत संकेतस्थळाला (www.mahajyoti.org.in) भेट द्यावी.
संकेतस्थळावरील Notice Board विभागात "Application for JEE/NEET/MHT-CET Batch-2025-27 Training" या लिंकवर क्लिक करून ऑनलाईन अर्ज फॉर्म भरा किंवा आवश्यक असल्यास अर्ज फॉर्म डाउनलोड करा.
सर्व आवश्यक माहिती काळजीपूर्वक भरून, आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा व अर्ज अंतिमतः सबमिट करा.
संपूर्ण परिपत्रक PDF स्वरूपात डाउनलोड करा:
(विकास गडपायले)
प्रकल्प व्यवस्थापक
महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), नागपूर
If you have any query regrading Site, Advertisement and any other issue, please feel free to contact at schooledutech.com@gmail.com