शैक्षणिक कर्ज म्हणजे काय? – पालकांसाठी संपूर्ण मार्गदर्शक
✍️ School Edutech Team
📌 Educational loan विषयी थोडक्यात माहिती सर्व पालकांसाठी अतिशय महत्त्वाची
शैक्षणिक कर्ज म्हणजे उच्च शिक्षणासाठी लागणारे फी, वसतिगृह खर्च, परीक्षा शुल्क, पुस्तक खर्च, व इतर गरजांसाठी बँकेकडून मिळणारी आर्थिक मदत होय.
राष्ट्रीय बँकांकडून शैक्षणिक कर्ज घेण्यासाठी काय करावे लागेल?
1️⃣ बँकेची निवड:
- SBI, PNB, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया यांच्याकडून कर्ज मिळू शकते.
- प्रत्येक बँकेचे व्याजदर, अटी वेगळ्या असतात.
- अधिकृत वेबसाइट किंवा शाखेतून माहिती घ्या.
2️⃣ पात्रता:
- भारतीय नागरिक असावा.
- मान्यताप्राप्त संस्थेत प्रवेश मिळालेला असावा.
- शैक्षणिक रेकॉर्ड चांगला असावा.
- वय: 16 ते 35 वर्षांदरम्यान लागू शकते.
3️⃣ अर्ज प्रक्रिया:
- अर्ज ऑनलाइन किंवा शाखेतून मिळवा.
- कागदपत्रांसह अर्ज सादर करा.
शैक्षणिक कर्जासाठी आवश्यक कागदपत्रे
विद्यार्थ्यांसाठी:
- ओळख व पत्त्याचा पुरावा (आधार, पॅन, पासपोर्ट)
- 10वी, 12वी, पदवी गुणपत्रिका
- प्रवेश पत्र व फी स्ट्रक्चर
- बँक स्टेटमेंट (जर असेल तर)
- पासपोर्ट साइज फोटो
पालक/Co-applicant साठी:
- ओळख व पत्त्याचे पुरावे
- उत्पन्नाचा पुरावा (सॅलरी स्लिप/ITR इत्यादी)
- मालमत्तेची कागदपत्रे (तारण असल्यास)
इतर:
- कोर्स पूर्ण होण्याचे अंदाजित पत्र
- तारण दस्तऐवज (आवश्यक असल्यास)
शैक्षणिक कर्ज किती मिळू शकते?
अभ्यासक्रम | कर्ज मर्यादा |
---|---|
भारतातील शिक्षण | ₹10 लाख पर्यंत |
परदेशातील शिक्षण | ₹20 लाख ते ₹80 लाख |
* ₹4 ते ₹7.5 लाखपर्यंत तारण लागणार नाही. त्यापुढील कर्जासाठी तारण किंवा गॅरंटी आवश्यक.
कर्जाची फेड कशी करावी?
⏳ Moratorium Period:
- कोर्स कालावधी + 6 महिने ते 1 वर्ष ग्रेस पिरीयड
- काही बँका फक्त व्याज भरण्याचा सल्ला देतात
💰 Repayment Period:
- 10 ते 15 वर्षांपर्यंत EMI द्वारे परतफेड
💳 परतफेडीचे मार्ग:
- NACH/ECS – स्वयंचलित EMI कट
- चेक्स
- नेट बँकिंग, UPI इत्यादी
महत्त्वाचे मुद्दे
- व्याजदर: 8.30% ते 13% दरम्यान
- कर सवलत: कलम 80E अंतर्गत व्याजावर सवलत – 8 वर्षे
- PM विद्यालक्ष्मी योजना: ₹10 लाखांपर्यंत शैक्षणिक कर्ज, सबसिडी उपलब्ध – vidyalakshmi.co.in
पालकहो, तुमच्या मुलाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी शैक्षणिक कर्ज एक सक्षम आधार ठरू शकतो – फक्त योग्य तयारी आणि मार्गदर्शनाची गरज आहे.
If you have any query regrading Site, Advertisement and any other issue, please feel free to contact at schooledutech.com@gmail.com